श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी सातारा च्यावतीने श्री गणेश आगमनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी “हिंदवी 89.6” या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा उद्घाटन समारंभ संस्थेचे सचिव श्री नानासाहेब कुलकर्णी व खजिनदार सौ अश्विनी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी, सौ रमणी कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह श्री मुकुंदराव आफळे, ॲड. योगेंद्र सातपुते, श्री शैलेश ढवळीकर, भाजप शहराध्यक्ष श्री. विकास गोसावी, श्री. किशोर गोडबोले, श्री. दत्ताजी थोरात, श्री. बाळासाहेब गोसावी, श्री अनंतराव जोशी, श्री विजयराव पंडित, श्री. दादा आहेरराव, मधु फल्ले, नवनाथ जाधव, प्रवीण शहाणे, विक्रम बोराटे, मनीषा पांडे, चंद्रकांत धुळप, आधिसभा सदस्य सुजित शेडगे, सारंग कोल्हापुरे, श्री. देवदत्त देसाई, धनंजय इनामदार, क्षितिज महाजनी, कर्नल प्रकाश नरहरी व शिक्षक वृंद, आदी मान्यवर यांसह संस्थेचे पदाधिकारी व शाहूनगरवासीय बहुसंख्येने उपस्थित होते.
हिंदवी 89.6 रेडिओ स्टेशनचे उद्घाटन भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 105 व्या “मन की बात” या संवादाच्या प्रसरणाने करण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे ‘हिंदवी 89.6’ सोहळ्यास साक्षात पंतप्रधानांच्या उपस्थितीचा भाव श्रोत्यांच्या मनात निर्माण झाला. मन की बात चे प्रसरण हिंदवी 89.6 वर प्रसारित झाल्यामुळे सातारकरांनी समाधान व्यक्त केले व त्याचा आस्वाद रेडिओद्वारे घेतला.
हिंदवी च्या वाटचाली विषयी भूमिका विशद करणारी श्री. अशोक कुलकर्णी व सौ. अश्विनी कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.
हिंदवी 89.6 चे संचालक ॲड. योगेंद्र सातपुते व रेडियो जॉकी श्री सचिन मेनकुदळे यांनी रेडिओ स्टेशनची मध्यवर्ती संकल्पना व कार्यान्वयनाविषयी संक्षिप्त माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांविषयी आभार व्यक्त करून या उपक्रमात सक्रिय सहभागा विषयी आवाहन केले.